स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजने अंतर्गत बांबूवर आधारित रोजगार जागृती प्रशिक्षण कार्यक्रम , जिल्हा ग्रामीण विकास योजना आणि कोकण बांबू अंड केन डेव्हलपमेंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिजाई महिला बचत गटाच्या वतीने कसाल येथे महिला बचत गटाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रत्येकी एक हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य वाटप कार्यक्रम सिद्धिविनायक मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजन तेली होते.
यावेळी मार्गदर्शन करताना राजन तेली म्हणाले की , आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न घेऊन अनेक विकासाची दालने खुली करणारे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री नारायण राणे यांनी आणि सौ. नीलम ताई यांनी ग्रामीण भागातील महिला बचत गटांना लघुउद्योग आतून आर्थिक सक्षमता आणण्याचे कार्य हाती घेतले आहे. निलमताई राणे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या जिजाई महिला महा बचत गटाच्या माध्यमातून जिल्ह्यातील बचत गटांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जात आहे.