जिल्ह्यातील सर्व बचत गटांना जिजाई महिला बचत गट महासंघातर्फे आर्थिक मदत करण्यात येणार आहे. महिला बचत गटांना आता नवे बळ देण्यासाठी मूळ भांडवल यापासून उत्पादनाच्या बाजारपेठेपर्यंत पालकत्वाची जबाबदारी जिजाईने उचलली आहे. भांडवल नाही त्यामुळे कार्यक्षमता असूनही अनेक बचत गट कोलमडले होते. या बचत गटांना तातडीने उभारी देण्याचा हा प्रयत्न आहे असे महा संस्थेच्या अध्यक्षा सौ.निलमताई राणे यांनी सांगितले.
मूळ भांडवलावरच कोलमडून पडणार बचत गटांना हा निर्णय म्हणजे संजीवनीच असणार आहे.याच बरोबर जे बचत गट आपल्या उत्पादनाची निर्मिती आणखी वेगाने करू इच्छितात, त्यांना तातडीने आर्थिक आणि सर्व स्तरावर मदत केली जाईल,असे सौ नीलम ताई म्हणाल्या.