Goals and Objectives

  • महिलांच्या शिक्षणासाठी, प्रशिक्षणासाठी तसेच व्यवसायाभिमुख शिक्षणासाठी प्रयत्न करणे.
  • ग्रामीण भागातील स्त्रियांच्या कल्याणासाठी प्रयत्न करणे.
  • ग्रामीण भागातील विधवा महिलांसाठी रोजगार निर्माण करणे, त्यांच्या कौटुंबिक समस्या आर्थिक समस्या, त्यांच्या अपत्यांच्या शिक्षणांची सोय व कुटुंबाच्या अनुषंगाने येणा-या अ‍डचणी सोडविण्याचा व इतर सोई, सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणे.
  • ग्रामीण भागातील दुर्बल घटकातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहून अर्थाजन करून आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करण्याकरिता योग्य मार्गदर्शन , प्रेरणा, प्रोत्साहन इ. प्रकारे मदत करणे.
  • ग्रामीण भागातील महिलांसाठी संस्थेच्या ध्येय व कार्याबददल जनजागृती करण्याच्या उद्देशाने महिला मेळावे, प्रदर्शने , विविध खत प्रकल्पा बाबत व्याख्याने, शिबीरे, शेती विषयक, पोल्ट्री, पशूपक्षी पालन, विविध खेळांच्या स्पर्धा, व्यक्तिमत्व विकास शिबीरे , मनोरंजनात्मकपर स्पर्धा , वक्तृत्व , निबंध स्पर्धा, नाटक, नृत्य, एकांकिका, गायन इ.स्पर्धाआयोजित करणे व शिबीरे आयोजित करणे.
  • सामाजिक वनीकरण, पर्यावरण चांगले राखण्यासाठी कार्यक्रम राबविणे.
  • योगा केंद्र चालविणे, विपश्यना केंद्र चालविणे, निसर्गोपचार केंद्र चालविणे, वृदधाश्रम, अनाथाश्रम चालविणे, पाळणाघर, बालवाडी, मुलींसाठी वसतीगृह चालविणे, ब्युटीपार्लर, फॅशनडिझायनिंग इत्यादी कोर्सेस सुरू करणे.
  • महिलांचे बचतगट स्थापन करणे, त्यांना मार्गदर्शन करणे, त्यासाठी स्वयंरोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीकोनातून व्यवसाय शिबीरे आयोजित करणे
  • जिल्हयातील बचत गटातील महिलांना उदयोग धंदे करण्यासाठी प्रवृत्त करणे, त्यासाठी लागणारे प्रशिक्षण देणे, कच्चामाल उपलब्ध करून देणे व पक्कयामालाची योग्य बांधणी करून बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे
  • वरील उद्दिष्टांची सुसंगत अनुषंगिक तसेच संस्थेच्या ध्येयपूर्तीसाठी पुरक व पोषक अशी कामे करणे
  • वरील उद्दिष्टे राबविताना संबंधीत खात्याची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील.