जिजाऊ बचत गटामार्फत महिलांना योग्य प्रकारचे प्रशिक्षण देऊन ग्रामीण महिलांचा जीवनस्तर उंचावला जाण्याचा प्रयत्न केला जाईल असे प्रतिपादन हळदीचे नेरूर येथील महिलांच्या मेळाव्यात सौ. निलमताई राणे यांनी केले.
दुर्गम भागातील हळदीचे नेरूर येथे प्रथमच सौ. निलमताई राणे व सौ. प्रियंका राणे या आल्या होत्या. त्यांचे विचार ऐकण्यासाठी माणगाव जिल्हा परिषद मतदार संघातील हजारो स्त्रिया व युवती दाटीवाटीने या मेळाव्यास उपस्थित होत्या.