Home

   जिल्हयातील महिलांना एकत्र करुन छोटे छोटे उदयोग सुरु करुन महिलांना आर्थिक दृष्टया सक्षम करण्याचा हेतू या उपक्रमामागे आहे. मा. सौ. निलमताई राणे यांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरणाचा हा उपक्रम आकारास येत आहे. आर्थिक समृध्दीतून महिलांचा सर्वागीण विकास होऊ शकतो हा या उपक्रमामागचा मुलभुत विचार आहे. याच विचाराने जिल्हयात उपलब्ध फळफळावळ व साधनसामुग्रीच्या आधाराने महिलांना उदयोजक बनविण्याचा उपक्रम जिजाई महिला संस्थेकडून राबविला जात आहे.

   जिजाई महिला सेवा संस्थेमध्ये महिलांचे बचतगट स्थापन करणे,वेगवेगळे उदयोग सुरू करण्यासाठी बचतगटांना मार्गदर्शन देणे व उदयोग सुरू करण्यास त्यांना प्रोत्साहित करणे, प्रत्यक्ष उदयोगांची उभारणी , बचतगटांच्या उदयोगांनी निर्माण केलेल्या उत्पादनांचे आकर्षक स्वरूपात मार्केटिंग अशी विविध कामे होणार आहेत. पॅकिंगसाठी लागणारी यंत्रसामुग्री  कोठून खरेदी करावी, त्याची किंमत, त्यासाठी कर्ज कसे उपलब्ध होईल यासंबंधीची सर्व माहिती संस्थेमध्ये मिळणारआहे. या सर्व कामकाजाचे प्रबोधन जिल्हयातील महिलांना या संस्थेमध्ये केले जाणारआहे.

Nilamtai Rane